Up to five. They lead your front page; everything else stays city wide.
You will get a Prime Alert when something breaks in these areas.
The city, and the morning. Back editions are the paper as it stood that day.
Loading the last ten editions…
नागपूर : ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने नागपूर शहरातील प्रमुख चौक दुमदुमून गेले. निमित्त होते केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (ता. ९) आयोजित भव्य ‘तिरंगा रॅली’चे. क्रांती दिनाचे औचित्य साधत देशभक्तीच्या वातावरणात निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहराचे देशभक्तीपर वातावरण निर्माण केले.
रामनगर चौकातील बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यापासून या रॅलीची सुरुवात झाली. महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ करण्यात आले. रामनगरहून निघालेली ही रॅली लक्ष्मी भुवन चौक मार्गे शंकर नगर चौकात पोहोचली. या रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे तब्बल ७०० मीटर लांब तिरंगा होता, जो नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागाने एका लांब प्रवासात झळकत होता. देशभक्तीपर सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे, महापौर श्रीमती निता ठाकरे, आमदार श्री. कृष्णा खोपडे, आमदार प्रा. संजय भेंडे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर, उपमहापौर श्रीमती लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती श्रीमती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र बाल्या बोरकर परिवहन समिती सभापती श्रीमती मंगला खेकरे,आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे, क्रीडा विशेष समिती सभापती श्रीमती दर्शनी धवड, जलप्रदाय विशेष समिती सभापती श्रीमती दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती श्रीमती धनश्री देशपांडे लक्ष्मी नगर झोन सभापती श्रीमती तारा यादव, नगरसेविका श्रीमती पूजा पाठक नगरसेवक श्री वीरेंद्र कुकरेजा, श्री योगेश पाचपोर, नगरसेवक श्री.सुनिल हिरणवार, माजी नगरसेवक संदीप जाधव, श्री.विजय होले, श्री. श्रीकांत आगलावे, श्री.रितेश गावंडे, श्री. विष्णू चांगदे नगरसेवक श्री. प्रदीप पोहणे, माजी आमदार श्री सुधाकर कोहळे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, श्रीमती अर्चना डेहणकर, तसेच अतिरिक्त आयुक्त श्री. मिलिंद मेश्राम सहायक आयुक्त श्री राजकुमार मेश्राम,शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना महाजन, क्रीडा अधिकारी डॉ पीयुष आंबुलकर, उपशिक्षणाधिकारी श्री सुभाष उपासे,एनडीएस पथक प्रमुख श्री. वीरसेन तांबे यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीची रचना अत्यंत आकर्षक होती. सर्वप्रथम ७०० मीटर लांब तिरंगा हाती घेऊन नागरिक चालत होते, त्यानंतर माजी सैनिक, अग्निशमन जवान, उपद्रव शोध पथकाचे जवान आणि वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळा, विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळा तसेच शिवणगाव मराठी शाळेचे विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते.
यावेळी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले संस्कृती नृत्य आणि गुरू तेजबहादुर सिंह साहेब गुरुद्वाराच्या वतीने दाखवण्यात आलेली शस्त्रांची प्रात्यक्षिके विशेष ठरली. तसेच, हातात तिरंगा ध्वज घेऊन स्केटिंग करत रॅलीचे नेतृत्व करणारे कु. अथांग राजगुरू आणि कु. उमंग नितनवरे उपस्थितांचे आकर्षण ठरले.
याप्रसंगी बोलताना महापौर श्रीमती निता ठाकरे यांनी सांगितले की, नव्या पिढीला आपल्या स्वातंत्र्याचे महत्त्व समजावे आणि देशसेवेची भावना रुजावी, यासाठी या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या देशभक्तांचे स्मरण करून देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची ज्योती नागपुरात कशी प्रज्वलित झाली, याची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली.
Source: Nagpur Today
This story has published but the live thread has not started. Updates appear here the moment the desk files one.
Asked once. After this the app never asks you for a city again.
Bengaluru was guessed from your connection. Nothing was set anywhere.
No account. No email. Nothing is shared. Pick your areas later, from You.
Bengaluru edition, on your home screen.
Two taps in Safari. No App Store, no account.
You are following this story.