Thursday, 13 August 2026 22:19 IST 22°C · Overcast AQI 170 · Moderate

Prime Alert All live updates →
22°C · Overcast AQI 170 · Moderate 22:19 IST
नागपुरात घरांची रजिस्ट्री प्रक्रिया थांबलेली नाही ना. श्री. नितीन गडकरी व ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

नागपुरात घरांची रजिस्ट्री प्रक्रिया थांबलेली नाही ना. श्री. नितीन गडकरी व ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

नागपुरात घरांची रजिस्ट्री प्रक्रिया थांबलेली नाही     ना. श्री. नितीन गडकरी व ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट
Nagpur Today

नागपूर – नागपूर जिल्ह्यात घरांची रजिस्ट्री (नोंदणी प्रक्रिया) थांबल्याची अफवा मोठ्या प्रमाणात पसरली आहे. परंतु, अश्याप्रकारचे कुठलेही आदेश केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले नाहीत, असे मंत्री महोदयांच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

ना. श्री. नितीन गडकरी यांच्या महाल येथील कार्यालयात नागनदी प्रकल्पाची कामे, इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र आदी मुद्यांवर बैठक आयोजित करण्यात आली. जिल्ह्यात नव्या घरांची रजिस्ट्री थांबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या नाहीत. पूर्वीच्याच नियमांप्रमाणे कायदेशीर कागदपत्रे सादर केल्यास, सर्वप्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध असल्यास घरांची रजिस्ट्री होत आहे, असे ना. श्री. गडकरी व ना. श्री. बावनकुळे यांनी स्पष्ट केले. मोठ्या इमारतींच्या बांधकाम परवानगी प्रमाणपत्र तसेच भोगवटा प्रमाणपत्राच्या (Occupancy Certificate) संदर्भात उपस्थित झालेल्या मुद्यामुळे लोकांमध्ये गैरसमज झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

नागपूर शहरातील ३६६९ इमारतींच्या बांधकामांपैकी ४२६ इमारतींसाठीच भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित ३२४३ इमारतींकडे भोगवटा प्रमाणपत्रच नाही. अश्यांना नोटीस बजावून चार महिन्यांच्या आत प्रश्न निकाली काढावा. यातील अनेक रहिवाश्यांनी अर्धवट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेऊन घर खरेदी केले आहे, त्यांच्या संरदर्भात संवेदनशीलतेने परंतु, कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्यवाही करावी. मात्र जे बांधकाम उद्योजक भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करण्यात हयगय करतील, त्यांच्या रजिस्ट्री करू नये, अश्या सूचना ना. श्री. गडकरी यांनी दिल्या.

Source: Nagpur Today

LIVE UPDATES

Key updates only
NO UPDATES YET

This story has published but the live thread has not started. Updates appear here the moment the desk files one.